तालुका फळरोपवाटिकेला डॉ. संजय पाटील भेट
मंठा प्रतिनिधी : मंठा तालुका फळरोपवाटिका अ.केंधळी येथे बदानपुर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे डॉ. संजय पाटील यांनी भेट दिली. यावेळी तंत्र अधिकारी मरकड , कृ.स. विकृससं का. छ. संभाजीनगर पाटील यांनी भेट देऊन पाहणी व तपासणी केली. व स्वरूप वाटिका विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी अधिकारी ता. रोफवाटिका दिलीप सुर्यवंशी, कृषि सहाय्यक यशपाल अवारे यांची उपस्थिती होती.
मोसंबी, सीताफळ, आंबा, कागदी लिंबाची जातिवंत रोपे केले असुन शासकीय दरात उपलब्ध आहेत. याचा लाभ जालना जिल्हा शेतकरी बांधवानी घ्यावा, असे आवाहन राम रोडगे उपविभागीय कृषी अधिकारी, परतूर तसेच दिलीप सुर्यवंशी कृषी अधिकारी ताफरोवाटिका मंठा यांनी केले.