मंठा पोलिसांची कारवाई , चोरीस गेलेल्या सहा मोटरसायकल जप्त
जालना प्रतिनिधी : मंठा शहरासह तालुक्यातुन चोरीस गेलेल्या सहा मोटर सायकल मंठा पोलीसांनी दोन आरोपींच्या ताब्यातुन केल्या जप्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की , मंठा शहरातील व तालुक्यातुन गेल्या अनेक दिवसापासुन मोटर सायकल चोरी गेल्या होत्या. याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मंठा पोलीस ठाण्यात फिर्यादी नामे कैलास मदनराव नखाते रा. हादगाव ता. पाथरी जि. परभणी यांनी त्यांची मोटरसायकल चोरी गेल्याची तक्रार दिली होती.
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल हि मंठा शहरातील अमोल प्रकाश दांडेकर वय 25 वर्षे रा. सम्राट अशोकनगर, मंठा ता. मंठा व मोसीन उर्फ उडिद रहेमत कुरेशी वय 27 वर्षे रा.इंदिरानगर, मंठा ता. मंठा जि. जालना यांच्याकडे असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे यांच्या पथकाकडुन त्यांना ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक करुन त्यांच्याकडे चौकशी करुन सदर गुन्ह्यातील 6 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
पुढील तपास हवालदार संजय चव्हाण हे करत आहेत.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अजकुमार बन्सल , अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी , उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर चौरे ,पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे साहेव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कैलास भारती, फौजदार बलभिम राऊत, पोहेकाँ संजय चव्हाण, विठ्ठल मेखले, सुभाष राठोड, पोना/शाम गायके, पोकाँ/सुनिल ईलग, मनोज काळे, पांडुरंग लिंबाळकर, आसाराम मदने श्रीकांत काळे, मांगीलाल राठोड, आकाश राउत यांनी केली आहे.