अहमदनगर, 20 जुलै (हिं.स.):- तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झाला असून शिक्षणाशिवाय पर्याय नाही यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळणे गरजेचे आहे.आजची पिढी ही उद्याच्या भारत देशाचे उज्वल भविष्य असून बालवायातच विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवणे गरजेचे आहे.बोल्हेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये दुर्बल वंचित घटकातील मुलं शिक्षण घेत असून पालकां च्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेकपाल्याला मधेच शिक्षण सोडावे लागते.यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी त्यांना शालेय साहित्याची गरज असते.तरी प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडावे.आ.संग्राम जगताप यांच्याबरोबर काम करीत असताना समाजाप्रती ऋणानुबंध निर्माण होत शिक्षणापासून कुठलाही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी प्रभाग ७ मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्या ची मदत केली जात असल्याचे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केले.
बोल्हेगाव गावठाण मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या हस्ते स्कूल बॅग वाटप करण्यात आले.यावेळी माजी सरपंच ज्ञानदेव कापडे,रमेश वाकळे,दिलीप वाकळे,सुरेश वायकर आदींसह पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षिका मीरा नरवडे म्हणाल्या की,बोल्हेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे.त्यांना वेळोवेळी कुमारसिंह वाकळे यांच्या माध्यमातून मदत मिळत असते.कुठल्याही संकट काळामध्ये ते धावून येत विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावतात.शाळे मध्ये दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहे, त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी कुमारसिंह वाकळे नेहमीच मदतीचा हात देत असतात असे त्या म्हणाल्या.