औरंगाबाद शहर पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त असलेल्या विशाल ढुमे यांच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांकडून यावरून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात होता. तर बुधवारपर्यंत ढुमे यांचे निलंबन न झाल्यास शुक्रवारी औरंगाबाद शहर बंद ठेवण्याची हाक खासदार इम्तियाज जलील यांनी दिली होती. त्यामुळे अखेर गृहविभागाने ढुमे यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे. तसेच निलंबन असेपर्यंत ढुमे यांना औरंगाबाद शहर पोलिसांच्या पूर्वपरवानगी मुख्यालय सोडता येणार नसल्याचे देखील आदेश दिले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...