आव्हाना प्रतिनिधी. सुरेश पांढरे भोकरदन तालुक्यातील आव्हाना हे गाव जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गाव आहे.
या गावाची लोक संख्या जवळपास 10000 हजार लोकवस्ती गावा आहे आणि याच गावातुन आमदार / खासदार आपल नशीब आजमावत आसतात याचा आव्हाना गावातुन जिल्हा परिषद व पंचायत समिती नशीब आवलबुन अस्ते आणि यांचा आव्हाना गावातुन दोन वेळा पंचायत समिती सभापती राहाण्याचा मान महिला सभापंती मिळाला आहे.आव्हाना गावातुन
माजी सभापती सौ. कडूबाई एकनाथ सरोदे व सौ. वैशाली विनोद गावंडे या भोकरदन पंचायत समिती सभापती राहिल्या आहेत.
आणि या आव्हाना येथील शेतवस्तीवर मुला व मुली शाळेत जाण्यासाठी एक रस्ता सुद्धा वेवस्थीत राहिला नाही.
शाळेच्या दिशेने जाणार्या रस्त्याची दुरवस्था झालेली दिसून येत आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहे. सध्याच्या पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे डबके तयार झाले असुन त्या पाण्यावर डासांचा वावर होत आहे. सर्वत्र चिखलमय रस्ता निर्माण झाला आहे. सर्वत्र शाळेची घंटा वाजली आणि सर्व शाळा, विद्यालये सुरु झाली. शैक्षणिक धडे शिकण्यासाठी विद्यार्थी आतुर आहेत पण चिखलाचा रस्ता येतोय आडवा! रस्त्यावरून पावसाळ्यात शाळेला जाताना मोठी कसरत करावी लागते.
दरवर्षी याच रस्त्याने शाळेला जाणार्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत जावे लागते. अनेक विद्यार्थी तसेच नागरिक चिखलात घसरून पडतात. हा रस्ता वर्दळीचा असून, दुचाकी देखील शाळेच्या दिशेने मार्गक्रमण करू शकत नाही कारण विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुरेसा रस्ता नाही. वाहनधारकांना तसेच पायी चालणार्या विद्यार्थ्यांना पालकांना खुप कसरत करत शाळेच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागत आहे.पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या चिखलमय रस्त्यावरून चालताना चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.आम्ही शाळेत कसं जायचं? आम्हाला शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकवर्ग करत आहे. या खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना वेळे वेळी आमदार व खासदार यांना निवेदन दिले आहे. दर वर्षी प्रमाणे पाच वर्षापासून रस्ता खराब आहे. पालकांना मानसिक व शारीरिक त्रास होताना दिसून येत असून.
( ग्रामपंचायत सदस्य शंकर कायटे याणा विचारणी केली आस्ता त्यानी मनेरीवाडी त आव्हाना हा 3 किलोमीटर रोडसाठी आम्ही वेळोवेळी भोकरदन तालुक्याचे आमदार संतोष पा दानवे व जालना जिल्ह्याचे खासदार रावसाहेब पा दानवे याना वेळे वेळी निवेदन दिले आहे. पण त्याणी आत्ता पर्यंत कोणता निवेदन वरील रस्ता दुरुस्त केला नाही . आव्हाना येथील केंद्र प्राथमिक शाळा आव्हाना ते मनेरीवाडी 3 किलोमीटर विध्यार्थी यांनी पाई प्रवास चिखलातून करावे लागेल आहे. येणारे विधानसभेचा आगोदर जर रस्ता झाला नाही तर आम्ही सर्व शेतवस्तीवर नागरिक
येणारे विधानसभेला मतदान बहिष्कार टाकणार असल्याची माहिती दिली आहे.) (आव्हाना ते मनेरीवाडी ते सिल्लोड कडे जाणारा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात रस्ता अतिशय खराब झाला असून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यात साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरून ये जा करणार्या नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांचेही जीव धोख्यात आले आहेत. या रस्त्यावर सिल्लोड तालुक्यात व आव्हाना येथे मोठ्या शाळा व महाविद्यालय आहे .
पण रस्ता नसल्यामुळे या रस्त्यावर आव्हाना गावात नागरिकांची मोठी वर्दळ असते मात्र खराब रस्त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. आणि प्रत्येक लोकसभा व विधानसभेला आली की आम्ही हा रस्ता करुण देउ आशी खोटी आश्वासन लोकप्रतिनिधी देत आले आहे .
आत्ता पर्यत रस्ता काही आजपर्यंत झाला नाही. प्रशासनाने व लोकप्रतिनिधी या अरस्ता कडे तातडीने लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील गावंडे यानी व शेतवस्तीवर नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे.)