Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता देऊ नका

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 27, 2024
in top news
0
मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता देऊ नका
0
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता देऊ नका
– कडुबा बोरसे

भोकरदन : भोकरदन मध्ये प्रशासन म्हणजे सावळा गोंधळ त्यातल्या त्यात पंचायत समिती म्हणजे कोणाचा ताळमेळ कोणाला नाही कधी या कधी जा कुठे राहा काम करा नका करू ” दिन जाओ पैसा आओ ” भोकरदन पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याला अनेक वेळा पत्र देऊन कळविण्यात आलेले आहे की पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार होतो कामे वेळेवर होत नाही ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना सन्मानपूर्वक वागणूक दिल्या जात नाही चकरा मारायला लावल्या जातात नियमात न बसणारे काम पैसे देऊन केले जातात परंतु नियमात बसणारे कामाकडे दुर्लक्ष केल्या जाते याबाबत आम आदमी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी खालील प्रमाणे मागणी केलेले आहेत त्या पूर्ण करून प्रशासनामध्ये सुधारणा करण्यात यावी.

1) कर्मचार्‍यांना  मुख्यालयी राहणे  सक्तिचे करावे अन्यथा घरभाडे भत्ता अदा करण्यात येऊ नये.
2) उशीरा येणार्‍या तसेच वेळे अगोदर पळुन जाणार्‍या कर्मचार्‍या बाबत कार्यवाही करुन अभिलेख ठेवावेत.
3)  कार्यालयीन कामात कोणतीही शिस्त आढळुण येत नाही. कार्यालयात व परिसरात स्चच्छता केली जात नाही. स्वच्छता गृहाची व्यवस्था नाही .योग्य कार्यवाही करावी.
4)  कार्यालयात येणार्‍या नागरीकांना सन्मानाची वागणुक  देण्यात यावी.
5)  कर्मचारी  नागरीकांना उडवाउडवीची उत्तरे देतात. प्रकरणे मुदतीत निकाली काढली जात नाहीत. आवक जावक रजिष्टरचे अवलोकन करुन दप्तर दिरंगाई बाबत कार्यवाही करण्यात यावी. वेगवेगळ्या योजनांचे अनुदान व औजारे  तात्काळ वाटप करण्यात यावे.
6) कार्यालयात प्रचंड भ्रष्टाचारी व कामचुकार कर्मचारी आहेत .आपण नियंत्रण ठेवावे  कार्यालयीन शिस्त असावी व कामचुकारांना शिस्त लावावी. भ्रष्टाचार बंद करावा.
7) आम आदमी पार्टि ही राष्ट्रीय पार्टि आहे हे आपणास ज्ञात असावे. तालुक्यात राबवीण्यात येत असलेल्या शासकिय योजना व  धोरण व कार्यक्रम या बाबत पार्टिला वेळोवेळी माहिती देण्यात यावी. अतिक्रमण धारकांची गांव निहाय यादी उपलब्द करुन देण्यात यावी
8)   भोकरदन तालुक्यातील प्रतेक गावासाठी नेमुन देण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची गाव निहाय उपस्थित राहण्याच्या दिवसासह यादी उपलब्द करुन देण्यात यावी.
9)  अनेक गांवाचे ग्रामसेवक गैरहजर राहात असल्याच्या ग्रामसभा व मासिकसभा घेत नसल्याच्या तक्रारी आहेत तसेच काम न करता कागदावर खर्च दाखवला जात असल्याच्या तक्रारी आहेत आपण नियमाप्रमाणे आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवावे.शिक्षण,महिला व बालकल्याण ,दलीत व दिव्यांगासाठी नियमाप्रमाणे खर्च करण्याच्या सर्व ग्रामसेवकांना सुचना देण्यात याव्यात  व  केलेला खर्च वेळोवेळी तपासण्यात यावा.
10) सुरु असलेली किंवा मंजुर करण्यात आलेल्या रस्ते ,बांधकाम,वर्गखोल्या व इतर कामांचे ईस्टिमेटची नागरीकांनी मागणी केल्यास तात्काळ झेराॅक्स प्रत देण्याबाबत सर्व संबंधीतांना आदेश देण्यात यावेत.
11) व्यैयक्तिक लाभाच्या योजना, जनावरांचा गोठा ,घरकुल तसेच विहिर  अनुदान योजना  खोट्या  दस्तऐवजांच्या आधारे  पैसे घेवुन,  अपात्र व्यक्तिना देण्यात आलेल्या  आहेत. मंजुरी बाबत चौकशी करुन योग्य कार्यवाही करावी.पडुव असलेले प्रस्ताव तात्काळ मंजुर करावेत.
12) पार्टिमार्फत जनतेच्या प्रश्नाबाबत पत्रव्यवहार करण्यात येतो. वैयक्तिक लाभासाठी पत्रव्यवहार करण्यात येत नाही. पार्टितर्फे देण्यात आलेली निवेदने  कायद्याच्या चौकटीत  निर्णय घेवुन वेळेत निकाली काढावीत  अथवा करण्यात आलेल्या कार्यवाही बाबत पार्टिच्या स्थानिक कार्य कर्त्यांना लेखी स्वरुपात वेळेत अवगत करण्यात यावे. अन्यथा कार्यकर्ते ऐनवेळी आक्रमक झाल्यास जबाबदारी प्रशासनाची राहील.
आपला सकारात्मक प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा  अन्यथा आंदोलना शिवाय पर्याय राहणार नाही व याची जबाबदारी आपली राहील.असा इशारा देखील आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील सोळंके यांनी दिलेला आहे.प्रत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.  जालना यांना माहिती व योग्य कार्यवाहीसाठी अग्रेषीत करण्यात आली आहे.

Post Views: 35
Previous Post

प्रबोधनकार ठाकरे हायस्कूल शहागड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना रजिस्टर वह्या व पुस्तकाचे वाटप

Next Post

श्रीगणेश व भगवान शिवाची मनोभावे आराधना करा ह.भ.प.अर्जुन महाराज मोठे यांचे प्रतिपादन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
श्रीगणेश व भगवान शिवाची मनोभावे आराधना करा ह.भ.प.अर्जुन महाराज मोठे यांचे प्रतिपादन

श्रीगणेश व भगवान शिवाची मनोभावे आराधना करा ह.भ.प.अर्जुन महाराज मोठे यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680181

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697