भंडारा, 30 जुलै (हिं.स.) : भंडारा जिल्ह्यात दोन दिवस पावसाने कहर केला. नदी, नाले, ओसंडून वाहू लागले. यात शेतीपिकांचे देखिल नुकसान झाले अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठं नुकसान झालं तर तुमसर शहरातील इंदिरा नगर येथील राहत असलेल्या प्रभाकर पाध्ये यांचा घर पावसामुळे कोसळला. सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.
पण त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं. आता दुसऱ्याच्या घरी त्याला आसरा घ्यावा लागला. शासनाने लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता पिढीत कुटूंब करीत आहे.