पुणे, 1 ऑगस्ट, (हिं.स.)। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस वाद सुरू आहे. राजकारणात विरोधक देखील असतात. माझी दोघांनाही विनंती आहे. दोघांनाही राजकारणात राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोडले असं नाहीये.
मला वाटतंय राजकारणात दोघेही राहतील. उद्धव ठाकरेंनी मनातील चीड काढून टाकावी. पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र यांच्यातील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी आहे, असे विधान केंद्रीय समजकल्याण मंत्री रामदास आठवले व्यक्त केले. लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त सारसबाग परिसरात मातंग समाज समन्वय समिती पुणे यांच्यातर्फे अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी केद्रीय समाजकल्याण मंत्री आठवले यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले हाेते.
लोकशाही अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असून, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे.