तीर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्येणुपुरी येथे भाविकांचा दर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
नवीन नांदेड प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे श्रावण मासातील पहिल्या सोमवारी परिसरातील भावी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला यावेळी काळेश्वर मंदिर परिसरात ठीक ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था व तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विष्णुपुरी येथील तीर्थक्षेत्र काळेश्वर यांच्या दर्शनासाठी परिसरातील भावीक भत्ता श्रावण महिन्यातील दर सोमवारी दर्शनास भावपूर्ण आपल्या कुटुंबीयासहदर्शनास रांगेत उभे होती दरम्यान काळेश्वर विश्वस्त समितीचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी आमदार मोहनराव हंबर्डे, बालाजी हंबर्डे, मारुती हंबर्डे, उत्तमराव हंबर्डे, शंकर हंबर्डे, माजी सरपंच तथा सरपंच प्रतिनिधी विलास हंबर्डे, नरसिंग हंबर्डे, संतोष पावडे, सतीश भेंडेकर यांच्या उपस्थितीत पुजारी रामेश्वर महाराज, गणेश धनमने, सतीश धनमने, राम धनमणे यांच्या विधीवत महा अभिषेक व गंगा पूजन करण्यात आले.
त्याचबरोबर मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे
‘मायओन’ मित्र मंडळाच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान दुपारी श्री माता रत्नेश्वरी पालखी वडेपुरी येथून निघून जानापुरी वाडीपाटी मार्गे दुपारी बारा वाजता काळेश्वर येथे पोहोचली यावेळी विष्णुपुरी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच यांच्या निवासस्थानासमोर पालखीची आरती व पूजा सरपंच सिंधुताई उर्फ संध्या विलास देशमुख हंबर्डे व उपसरपंच सौ अर्चना विश्वनाथ हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आली व नंतर ही पालखी काळेश्वर मंदिर देवस्थानाकडे रवाना झाली.
यावेळी पालखी पद यात्रेतील महिला भाविकांची हजारोच्या संख्येने मोठ्या प्रमाणात होती. यावेळी मंदिर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली १२ पोलीस अधिकारी, ७६ पोलीस पुरूष आमलदार, 23 महिला पोलिस आमलदार, ३० पुरुष होमगार्ड, ९ महिला होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.