भोकरदन : तालुका शिवसेनेच्या आढावा बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे भास्कर रावजी आंबेकर म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेकांनी झटून कामाला लागावे घर तेथे शिवसैनिक गाव तेथे शिवसेना, बूथ प्रमुख, गटप्रमुख, पक्षाचे बीएलओ यांच्या नियुक्तांकरून संघटन मजबूत करण्याचे काम शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी करावे. सध्याचे सरकार हे जनतेची दिशाभूल करणाऱ्या खोट्या घोषणा करीत असून या सर्व घोषणा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या गेले आहे
याविरुद्ध शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी कोरणा काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेचा कुटुंबाप्रमाणे सांभाळ केला सोबतच शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने कर्जमाफी दिली, नियमित कर्ज भरणाऱ्या ला 50000 पर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली होती परंतु गदारांनी धोक्याने सरकार पाडल्यामुळे त्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत मिळाला नाही परंतु महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याला एक नंबर वर आणण्यासाठी परत एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकांला बसवण्याचे जे स्वप्न पाहिले आहे
ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी झटून कामाला लागावे जो पदाधिकारी निष्क्रिय असेल त्याला पदमुक्त करण्याचे काम यापुढील काळामध्ये करावे लागेल असे यावेळी म्हणाले याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी भोकरदन तालुक्यातून 25000 शिवसेनेकांची सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प घेतला व लवकरात लवकर पक्ष संघटनेची बांधणी करण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी नवनाथ दौड यांनी प्रास्ताविक केले तर महेश पुरोहित यानी केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख देवनाथ जाधव तालुकाप्रमुख नवनाथ दौड, शहर प्रमुख महेश पुरोहित माजी कृषी संचालक सुभाष राऊत , ज्ञानेश्वर साहाणे, विठ्ठल पवार, विठ्ठल गावंडे, तुकाराम फुसे, कृष्णा काळे, राजू शेळके, देविदास गोरे, पांडुरंग राजपूत, माधव चौधरी, विक्रम सिंग राजपूत अनिल कोल्हे, रायभान शिंदे ,तुकाराम कोथळकर , रितेश देशपांडे,अनिल वाघ ,भागवत जंजाळ, प्रदीप पैठणकर, राहुल कोथळकर ,संतोष सुसर, राजू सोनवणे, बाळू जाधव, सुधाकर साबळे, समाधान राऊत, रावसाहेब तराळ, अमोल निवासकर, संतोष सुरडकर, संदीप लाड, माधव पारवे, योगेश पुरोहित, रवी सुरसे, कृष्णा तराळ, पिराजी जाधव, यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…