जाफराबाद /प्रतिनिधी
जरांगे पाटलांचा प्रश्न हा राजकीय आहे त्यामुळे तो राजकीयच राहिला पाहिजे परंतु तो सामाजिक झाला असल्याने गावागावात दोन गट पडलेले आहेत सामाजिक दुरी निर्माण झाली आहे.
यामुळे भविष्यात ओबीसींना राजकीय आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसींचे १०० आमदार विधानसभेत गेले पाहिजे त्यासाठी प्रत्येक ओबीसी ने जागरूक रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
व्यासपीठावर ओबीसी नेते दीपक बोर्डे वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर उपाध्यक्ष पांचाळ सविता मुंडे अलकाताई जायभाय प्राध्यापक मनोज निकाळजे दीपक डोके डॉ. प्रवीण कडूकर सुरेश गवळी यांची उपस्थिती होती.
आरक्षण बचाव यात्रेनिमित्त जाफराबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. आरक्षणाचा प्रश्न राजकीय असताना राजकारण्यांनी त्यावर तोडगा काढला नसल्याने हा प्रश्न सामाजिक झाला यामुळे आपण ही यात्रा काढली.
निवडणुकीत काय परिणाम भोगायचे ते बघू कारण राज्यात सद्यस्थितीत मनिपुर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे शरद पवारही सध्या चिंतेत आहेत. तर १९७७ झालेल्या नामांतरासारखी परिस्थिती सद्यस्थितीत गावोगावी निर्माण झाली आहे. आपण २२ जिल्ह्यात आरक्षण बचाव यात्रा काढली असून गावातील समाजात दोन गट निर्माण झाले आहेत.
वंचितच्या नांदेड येथील कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. या दडपशाहीला भिण्याचे कारण नाही कारण जनतेत परिवर्तन होताना दिसत आहे राजकीय मतभेद सामाजिक होता कामा नये म्हणून सरकारचे काम चूक की बरोबर हे तपासणे सामान्य च्या हातात आहे आपल्या विचाराचे सरकार आले तर जनतेच्या हातात आहे आपल्या विचाराचे सरकार आले तर आरक्षण टिकू शकते यामुळे भविष्यात ओबीसींनी आरक्षण टिकवण्यासाठी जागरूक रहावे. आरक्षण बचाव यात्रेमुळे सत्ताधिकारी मराठ्यामध्ये घबराहट निर्माण झालेली आहे ती कायम ठेवावी लागेल.
विधान, राज ठाकरवर टाडा लावण्याचाहा कला मागणा
ठराविक समाजाने सत्तेला कैद केले आहे तिला मोकळ करण्याचं काम निवडणुकीत ओबीसी बांधवांना करावी लागेल यामुळे ओबीसींनी विधानसभेत १०० आमदार पाठवावे कारण ही लढाई आता रस्त्यावरची नसून विधानसभेतली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ पैठण यांनी केले.
विधानसभेत ठराव मंजूर व ना मजूर करायला किमान १४५ आमदार लागतात. यामुळे ओबीसींनी १०० आमदार निवडून दिले तर एससी एसटीचे आरक्षित जागेवरील ५७ आमदार निवडून येतील यामुळे विधानसभेत ओबीसींच्या विरोधात ठराव घेतला जाणार नाही यामुळे ओबीसींनी झाडून पुसून वंचितला मतदान करावे. महाराष्ट्रातील सत्ता १५९ कुटुंबातच आहे. जिल्ह्या जिल्ह्यातही ठराविक लोकांची सत्ता कायम असते यामुळे सत्तांचे केंद्र बदलण्यासाठी ओबीसींनी एकजूट करणे आवश्यक आहे जालना जिल्ह्याने राज्याला वेठीस धरले असल्याने ही आरक्षण बचाव यात्रा काढावी लागल्याचेही श्री आंबेडकर यांनी सांगितले.