स्वतः नोंदवा पिकपेरा•जाफ्राबादच्या तहसीलदार डॉ. सारिका भगत यांचे आवाहन
शासकीय योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर ई-पीक पाहणी करणे गरजेचे
जाफ्राबाद/ प्रतिनिधी
……………………………………….
अॅपच्या विषयी शेतकऱ्यांच्या शंकांचे केले निरसन
फोटो खाली…..गोंधनखेडा येथे ई-पीक पाहणी विषयी शेतकऱ्यांना माहिती देतांना तहसिलदार डॉ भगत, मंडळाधिकारी अविनाश देवकर यावेळी उपस्थित शेतकरी
जाफ्राबाद तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदारांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी अॅपमध्ये करण्याचे आवाहन तहसिलदार डॉ. सारीका भगत यांनी केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंद करणे आवश्यक असून यासाठी १ ते १५ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आलेली आहे. यामुळे मुदतीत नोंदणी करावी, असेही डॉ. भगत म्हणाल्या.
पीक विमा, पी. एम. किसान सन्मान योजना, सोसायटी किंवा बँकेकडून पीक कर्ज मिळवणे, अतिवृष्टी, गारपीट नुकसानभरपाई, कांदा अनुदान आदी अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ई- पिकपाहणी आवश्यक आहे. नोंद न केल्यास सद्र जमीन पडीक म्हणून नोंद होते. त्यामुळे पिक पाहणीचे महत्व पटवून देत महसूल विभागाकडून ठिकठिकाणी माहितीपत्रके, भीतीपत्रके व सोशल
मीडिया तसेच गावोगावी जावून जनजागृती केली जात आहे. १ ऑगस्ट पासून १५ सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदणी सुरु होणार आहे. ती १५ आक्टोबर पर्यंत करता येईल मुदतीत जे शेतकरी ई-पीक पाहणी करु शकणार नाहीत
त्यांना पीक विमा, पिक कर्ज, नुकसान भरपाई आदी सारख्या योजनांचे लाभ मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
अॅप अपडेट करून घ्यावे
सर्वर डाऊनमुळे ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत असून त्यासाठी अॅप अपडेट करून घ्यावे तरीही अडचणी उद्भवत असल्यास संबंधित तलाठी अथवा महसूल कर्मचाऱ्यांचे सहकार्य घ्यावे, असे तहसिलदार डॉ. सारीका भगत यांनी सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले, प्रश्नांना उत्तरेही दिली.
अॅपवर जाऊन यादीत नाव असल्याची करून घ्या खात्री