संजय कुलकर्णी
उमरी(प्रतिनिधी) उमरी नगर परिषद हद्दीतील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले असून पाऊसाळ्यात ते खड्डे न ओळखता आल्यामुळे अनेकदा अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण होते आहे उमरी नगर परिषद प्रशासनाने वेळीच लक्ष देवून शहरातील खड्डेमय रस्ते दुरुस्त करावे अशी मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी मुख्यधिकारी उमरी यांना दिले आहे .
भोकर रोडवरील रेल्वेगेट ते कै. गिरीश भाऊ गोरठेकर सांस्कृतिक सभागृह ह्या रस्त्यावर रापतवारनगर, श्री. महादेव मंदीर, नविन बसस्थानक, सांस्कृतिक सभागृह येतात त्या भागात बाजारपेठ आहे. तो संपूर्ण रस्ता वर्दळीचा असून खड्डेमय झाला आहे. नगर परिषद प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले असून
उपरोक्त रस्त्यावरील खड्डे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ बुजवावेत अन्यथा भारतीय स्वातंत्र्य दिनाचे दिवशी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसणे भाग पडेल अशा आशयाचे निवेदन उमरीचे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांना दिले आहे.
सदरील निवेदनाच्या प्रति तहसीलदार उमरी आणि पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन उमरी यांना दिल्या आहेत.