वाळूज महानगर ( तरुण भारत प्रतिनिधी) वाळूज औद्योगिक परिसरातील वुई फॉर एनव्हायरमेंट वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन फाऊंडेशन, सह्याद्री वृक्ष बँक, सामाजिक विचार मंच, लायन्स गृप क्लासिक, जॉयंट गृप ऑफ वाळूज, राजेश मानधनी परिवार व अभय देशमुख परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या टप्प्यातील छत्रपती संभाजीनगर ते नगर रोड वरील ए एस क्लब ते तिरंगा चौक(ओयासिस हॉटेल) दरम्यान असलेल्या दुभाजका मध्ये एकुण अकराशे पन्नास विविध प्रजातींच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
तसेच कामगार चौक ते वाळूज रोडवरील दुभाजकावर दुसऱ्या टप्प्यातील वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील गोलवाडी फाटा ते वाळूज गावापुढील असलेला टोलनाका या एकंदरीत दुभाजकावर विविध संस्थांच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे . या वृक्ष लागवडीच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन पर्यावरण सेवेत श्रमदान करण्यासाठी उपस्थित राहाण्याचे आवाहन कमलजी पहाडे, शरद गहिले, विष्णुदास पाटील, कृष्णा गुंड, केशव ढोले, रवींद्र शेलगावकर, डॉ रवींद्र देवकर व शिवाजी राऊत व परिसरातील पर्यावरण प्रेमींनी केले आहे.