भोकरदन : भोकरदन तालुक्यातील कोपर्डा येथे कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 07 ऑगस्ट 2024 राजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास जाणावऱ्याच्या गोठ्यात दोरी च्या साहयाने गळफास घेतलेल्या अवस्थेत निदर्शनास आले.
लक्ष्मण रामराव भांबीरे वय 63 रा. कोपर्डा तालुका भोकरदन जि. जालना असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले असता डॉकटर यांनी तपासून मृत्य घोषित केले. त्यांच्या मृत्य देहावर शवविच्छदन करून मृत्य देह नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहे.कोपर्डा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.
त्यांच्या पच्यात पत्नी, एक मुलगा, 2मुली, सुन असा परिवार आहे.
दरम्यान, सतत नापिकी, दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने घेतलेले कर्ज कसे फेडणार या विवेचणे तुन लक्ष्मण भांबीरे यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांच्या वतीने सांगितले जात आहे.या घेटनेचा पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉ. दादाराव बोर्डे,गोपाल सातवण, नंदकुमार दांडगे यांनी पंचनामा करून भोकरदन पोलिस ठाण्यात अकास्मित मुर्त्यूची नोंद घेण्यात आली आहे.