नवीन नांदेड प्रतिनिधी
नांदेड दक्षिण मतदार संघातील वाजेगाव सर्कल चे माजी जि प सदस्य मनोहर पाटील शिंदे हे दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी खासदार वसंतराव चव्हाण व आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या उपस्थितीत पुन्ह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे दक्षिण मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
नांदेड लोकसभा २०२४ च्या निवडणुका पूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याबरोबर माझी जि प सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता. सदरील पक्षांच्या जाचक अटीमुळे व तेथील कार्यप्रणाली आपणास व्यवस्थित वाटली नसल्यामुळे आपण पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निश्चय केला दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण व दक्षिण मतदार संघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
भाजपातील एकेरी कार्यप्रणाली मुळे आपणास जनतेची सेवा करता येत नसल्यामुळे आपण आपल्या स्वघरी परतण्याचा निश्चय करून दिनांक ७ ऑगस्ट रोजी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मनोहर पाटील शिंदे यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल दक्षिण मतदार संघात काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार हे निश्चित असल्याचे दिसून येते. व त्यांच्या प्रवेशामुळे मतदारसंघातील पक्षांचे कार्यकर्तेही उत्साही झाले.