पंढरपूरमधील अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये तिस-या इयत्तेत शिकणारी अनन्या भादुले हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.शाळेमध्ये पेपर सोडवत असताना अनन्याला चक्कर आली. शाळेतील शिक्षकांनी तातडीने तिला दवाखान्यात नेले. मात्र यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती तिचे नातेवाईक ऍड राजेश भादुले यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. येथील अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये दुर्दैवी घटना घडली. शाळेत घटक चाचणी सुरु होती. इयत्ता तिसरीमध्ये शिकत असलेली अनन्या अतुल भादुले ही पेपर सोडवत होती. पेपर सुटण्यास काही वेळ शिल्लक असताना तिला अचानक चक्कर आली. हि बाब वर्गातील शिक्षकांच्या लक्षात आल्यावर तिला तातडीने दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. तसेच तिच्या पालकांशी संपर्क केला. मात्र दवाखान्यात उपचार करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. अनन्याच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. शवविच्छेदनाचा अहवाल येणे बाकी आहे.याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली आहे. तिला दोन दिवसापूर्वी ताप होता, अशी माहिती आहे. असे असले तरी अवघ्या नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...