प्राथमिक लेआऊट मंजूर असलेल्या भूखंडधारकांना आता नोंदणीकृत आर्किटेक्ट-इंजिनिअरकडून जागेची मोजणी करुन घेऊन महापालिकेकडून बांधकाम परवाना वा बांधकामाचे नियमितीकरण करून घेता येणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी काढले आहे. शहरातील अनेक भूखंडांच्या प्राथमिक लेआऊटला मान्यता आहे, पण अशा भूखंडांबाबत रीतसर नोंदणी, एनए करून घेऊन अंतिम लेआऊटला मान्यता घेण्याचे काम बिल्डर्सकडून झाले नाही. या पार्श्वभूमीवर अशा बिल्डर्सची जागांची विक्री केली. अशा भूखंडासंदर्भात अनेक वाद निर्माण झाल्याने तसेच तक्रारी असल्याने महापालिकेकडून गत दोन-तीन वर्षांपासून अशा भूखंडातील प्लॉटधारकांना बांधकाम परवाना देण्याचे तसेच परवानगीशिवाय केलेल्या बांधकांमाचे नियमितीकरण करण्याचे काम थांबविण्यात आले होते.अशा भूृखंडांबाबत संबंधित प्लॉटधारकांनी नगर भूमापन कार्यालयाकडून वैयक्तिक मोजणी करून घ्यावी, असा सल्ला महापालिकेने दिला होता, मात्र नगर भूमापन कार्यालयाचे वैयक्तिकऐवजी संपूर्ण लेआऊटची मोजणी करुन घ्यावे, असे म्हणणे आहे. यामुळे बांधकाम परवाना, नियमितीकरणाचा गुंता सुटत नव्हता. या पार्श्वभूमीवर महापालिकेने यावर तोडगा काढणारे परिपत्रक काढले. यानुसार वैयक्तिक भूखंडधारकांना बांधकाम परवाना घेण्यासाठी वा बांधकामाचे नियमितीकरण करून घेण्यासाठी नोंदणीकृत आर्किटेक्ट इंजिनिअर कडून जागेची मोजणी करुन घ्यावी लागणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...