भोकरदन : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या भोकरदन विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची पहिली बैठक समितीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली व समितीचे नवनियुक्त अशासकीय सदस्य श्री.मुकेश रामचंद्र चिने व श्री. संतोष रामराव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. 14/08/2024 रोजी तहसिल कार्यालय, भोकरदन येथे संपन्न झाली. यावेळी समितीचे शासकीय सदस्य म्हणुन भोकरदनचे तहसिलदार श्री. संतोष बनकर, जाफ्राबादच्या तहसिलदार श्रीमती सारिका भगत, भोकरदनचे गटविकास अधिकारी श्री. गजानन सुरडकर, जाफ्राबादचे गटविकास अधिकारी श्री. खिल्लारे, भोकरदनचे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. शिवाजीराव नागरे, जाफ्राबादचे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. विनय साळवे आणि भोकरदन-जाफ्राबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. वाघमारे यांच्यासह संबधित कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी समितीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांचे भोकरदन तहसिलदार श्री. संतोष बनकर यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. तर समितीचे अशासकीय सदस्य श्री. मुकेश रामचंद्र चिने व श्री. संतोष रामराव लोखंडे यांचे स्वागत अनुक्रमे गटविकास अधिकारी गजानन सुरडकर व जाफ्राबादच्या तहसिलदार श्रीमती सारिका भगत यांनी केले. त्यानंतर समितीचे सदस्य सचिव श्री. शिवाजीराव नागरे यांनी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गंत दिनांक 13 आॅगस्ट 2024 पर्यंत भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यामध्ये नावनोंदणी करण्यात आलेल्या लाभाथ्र्यांचा आढावा सादर केला. त्यापैकी भोकरदन तालुक्यातील 45,164 आणि जाफ्राबाद तालुक्यातील 26,327 अशा एकुण 71,491 पात्र महिला लाभाथ्र्यांच्या नावांवर समितीच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली. समितीने मंजुर केलेल्या एकुण 71,491 महिला लाभाथ्र्यांच्या वैयक्तीक बॅंक खात्यावर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जमा करण्यासाठी राज्यशासनाकडे शिफारस करण्यात आली असुन त्या बाबतच्या शानाने निर्धारीत केलेल्या प्रमाणपत्रावर समितीचे अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांनी स्वाक्षरी करुन दिली. त्यामुळे भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील 71,491 लाडक्या बहीणींना रक्षाबंधनापूर्वीच सदर रक्कम त्यांच्या वैयक्तीक बॅंक खात्यावर जमा होणार आहे.
यावेळी बोलतांना आमदार संतोष पाटील दानवे म्हणाले की, सदर योजना ही माता-भगिनींच्या मनात आर्थिक स्वावलंबनाची भावना निर्माण करणारी व त्यांच्यामध्ये आर्थिकदृष्टया जाणीवजागृती करणारी असल्यामुळे या योजनेची अंमलबजावणी मध्ये कुठलाही पक्षपात व हलगर्जीपणा न करता पात्र असलेल्या प्रत्येक बहिणीला या योजनेचा लाभ मिळवुण देण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करा. तसेच एकही पात्र महिला लाभार्थी या योजनेपासुन वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यासाठी तालुक्यातील ग्रामसेवक, आंगणवाडी कार्यकत्र्या व आशा स्वयंसेविका यांना सदर योजनेची नावनोंदणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सुचना देवुन त्याचा वेळोवेळी आढावा घेवुन योजनेच्या अंमलबजाणी बाबत मला आवगत करावे अशा सुचनाही आमदार संतोष पाटील दानवे यांनी उपस्थिती अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.