सोलापूर शहरात जुना पुणे नाका ते भैय्या चौक ते रेल्वे स्टेशन ते पत्रकार भवन आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती गेट, जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाण पूल होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम होणार आहे. यासाठी भूसंपादनाची संपूर्ण जबाबदारी ही सोलापूर महापालिकेची राहणार आसल्याने या कामकाजाला प्रत्यक्षात सुरुवात झालीय. शुक्रवार पासून जुना पुणे नाका परिसरात सकाळी एक वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलासाठी बाधित मिळकती ताब्यात घेण्यासाठी जागेवर मोजमाप करून प्रत्यक्षात खुणा करण्यात आल्या. यावेळी साह्ययक अभियंता दिवानजी तसेच भूसंपादन विशेष घटक अधिकारी,नगररचना अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान उड्डाण पुलाच्या कामाचे विविध टप्पे करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात पूना नाका, छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या या भागातील प्रत्येक्षात भूसंपदानासाठी भूसंपादन विशेष घटक यांनी जागा ताब्यात घेण्याचे सुचित केले होते. त्यानुसार पूना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागातील बाधित मिळकती ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरवात करण्यात आलीय. या भागात एकूण 30 मिळकती बाधित झाल्या आहेत. या मिळकती ताब्यात घेतल्यानंतर मालमत्ता पत्रकावर महापालिकेचे नाव चढवण्यात येणार आहे आणि त्या नंतर राष्ट्रीय महामार्गाकडे कामासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहेत. अशी माहिती सहायक अभियंता दिवाणजी यांनी प्रसारमाध्यमाना दिलीय. यावेळी मात्र मिळकतदारांनी सर्व प्रथम संपूर्ण ते ही तीन पटीने मोबदला द्यावा त्यानंतर प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी आग्रही भूमिका घेत पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. यावेळी नागरिकांची संख्या वाढल्याने मोजमाप करतेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडवू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात करण्यात आला होता.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...