करकंब प्रतिनिधी:-१५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्या विकास मंदिर उंबरे (पागे) ता.पंढरपूर येथील ज्या १० गरजू,हुशार,गरीब,दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थिनींची गैरसोय होत होती.त्या विद्यार्थिनीची गैरसोय दूर व्हावी,आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही मानवी भावना मनी ठेवून मूळ उंबरे (पागे) येथील विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय वाघोलीचे सेवानिवृत्त
मुख्याध्यापक सुभाष नामदेव गायकवाड व त्यांचे सुपुत्र राहुल सुभाष गायकवाड.एसीपी नवी मुंबई,सिद्धार्थ सुभाष गायकवाड उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांचेकडून सुभाष गायकवाड यांचे नातू कबीर राहुल गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विद्या विकास मंदिर उंबरे (पागे) येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थीनींना १० सायकली मोफत सप्रेम भेट देण्यात आल्या.
याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष गायकवाड यांनी गायकवाड परिवारातर्फे इयत्ता १०वी व १२वीमध्ये प्रशालेत प्रथम क्रमांकाने येणारा विद्यार्थी तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून इयत्ता १०वी व १२वी मध्ये प्रथम क्रमांकाने येणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी प्रशलेतर्फे सुभाष गायकवाड, राहुल गायकवाड,सिद्धार्थ गायकवाड व गायकवाड परिवाराचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव ढोबळे,अधक्ष राजाराम नरसाळे,सचिव बलभीम पाटील,मुख्याध्यापक बी.जे.शिंदे,उंबरे (पागे)येथील विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.