नवीन नांदेड प्रतिनिधी
सिडको येथील साई नर्सिंग होम व अंकुर मॅक्स हॉस्पिटल नांदेड यांच्या संयुक्तविद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त स्त्रीरोग व बालरोग तपासणी शिबिर दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता घेण्यात आले. या शिबिरास सिडको हडको परिसरातील रुग्णाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सिडको येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ. नरेश रायवार यांच्या साई नर्सिंग होम क्रांती चौक सिडको व अंकुर मॅक्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सिडको येथे सवलतीच्या दरात ५० रुपये नोंदणी फीस घेऊन येथील तज्ञ डॉक्टरांनी गरोदर मातांची तपासणी, वंदत्व निवारण व सल्ला, मासिक पाळीतील आजार व उपचार, गर्भपिशवी संबंधी आजार व उपचार तसेच १ ते १२ वयोगटातील मुला/ मुलींची तपासणी व सल्ला वरील आजाराचे तज्ञ डॉक्टर्स डॉ. अंजली मद्रेवार कुंचेलिकर, डॉ. नीता नरेश रायवार, डॉ. राजेश कुंचेलिकर बालरोग तज्ञ यांनी योग्य त्या तपासण्या करून रुग्णांना योग्य तो सल्ला देण्यात आला.
वरील सर्व रोगांचे उपचार साई नर्सिंग होम क्रांती चौक सिडको येथे नेहमीसाठी चालू राहील. सदरील शिबिरास सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी संभाजी कास्टेवाड, डॉ.रमेश मुत्तेमवार,डॉ. प्रमोद पाटील, डॉ. अशोक कलंत्री, डॉ. ललिता बोकारे, विजयाताई गोडघासे, तुकाराम पातेवार, अण्णा देशमुख, गोविंद कवटिकवार, प्रसन्न उत्तरवार यांची उपस्थिती होती. तर सदरील शिबिर यशस्वी करण्यासाठी परिचारिका वर्षा वाघमारे, वंदना डांगे, योगेश मुंगल यांनी परिश्रम घेतले.