मुदखेड येथील जनावराचे व्यापारी एकबाल कुरेशी व त्यांचे नातेवाईक हे नेहमी प्रमाणे नायगाव बाजाराला जात असताना मुदखेड चिकाळा रोडवर बुलेरो गाडीला तीन चोरट्यांनी दुचाकी वर येऊन जीबवर हल्ला केला गाडीचे काच फोडून व्यापाऱ्याजवळील एक लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लूटून पळवली असल्याची घटना दि.१९ जानेवारी सकाळी पाच वाजता दरम्यान मुदखेड ते ईजळी चिकाळा रोडवर घटना घडली आहे.
चोरट्यांनी तोंडावर माकडटोपी सारखं पुर्ण तोंड झाकुन तलवारी ने केलेल्या हल्ल्यात जनावरांचे व्यापारी एकबाल कुरेशी राहणार मुदखेड व दुसरा शेख अस्लम कुरेशी, महंमद सोहेल खुरेशी, शेख आलीम शेख खाशीम असे बुलेरो गाडी चालकाला धरून चार जण होते गंभीर जखमी झाले आहेत.
इकबाल कुरेशी जनावराचा व्यापारी यांनी सकाळी पाचच्या दरम्यान मुदखेड येथील शारदा पेट्रोल पंप या ठिकाणाहून गाडीमध्ये डिझेल भरून ईजळी फाट्यापासून काही अंतरावर गेल्या नंतर माळकौठा मुदखेड रोडचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे त्या खराब असलेल्या रोडवर वाहन चालक सावकाश आपली बुलेरो घेऊन जात होते.
सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका मोटरसायकलवर तीन अनोळखी इसाम समोरून येऊन गाडी समोर आडवी लावली चालकाने वाहन थांबण्याचा प्रयत्नात असतानाच मोटार सायकलचे पाठीमागे बसलेले दोन अनोळखी इसमापैकी एकाच्या हातात तलवार एकाचे हातात खंजर घेऊन चालकाच्या बाजूने व दुसरा एकबाल कुरेशी यांच्या बाजूने येऊन पिकप ची स्टेरिंग हलवीत साईड ग्लास फोडले
चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून जॅकेट मध्ये पैसे असलेले काढण्याचा प्रयत्न केला पैसे देण्यास नाकार देतात चोरट्यांनी एकबाल यांना मांडीवर आठ ते दहा वेळा वार करून जखमी केले व अंगात असलेले जॅकेट उडून मुदखेड कडे मोटरसायकलवर बसून पसार झाले असल्याची अशी तक्रार त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. जखमी अवस्थेत पडलेला एकबाल कुरेशी यांच्या मदतीसाठी सोबत असलेल्या युवकांनी आरडाओरडा केला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मदतीची हाक मागितली परंतु चोरट्यांनी पैसे घेऊन पसार झाले.
जखमी झालेल्या व्यापाऱ्याला ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.
रोड राबडीची घटना मुदखेड तालुक्यात वारंवार होत असल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोलीस कर्मचारी आयलवाड, ठाकुर, पांचाळ,मठपती यांनी घटनास्थळी पाहणी केली..
सदर घटनेचा गुन्हा पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झाला घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शर्मा हे करीत आहे.
सदर सदर घटनेच्या माहिती मिळताच एलसीबी पोलीस पथक मुदखेडात दाखल झाली चोरट्यांचा शोध लावण्यासाठी
पोलिसां पुढे मोठे आव्हान उभे राहिले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...