वाळूज महानगर ( प्रतिनिधी) सामाजिक विचार मंच व पुर्णम ईकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टचे औचित्य साधून बजानगरातील नाना नानी पार्क येथे गजानन नांदुरकर, केशव ढोले, चंद्रकला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व कामगार कल्याण निरिक्षक विजयानंद अहिरे व पोपट रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ई कचरा संकलन केंद्राचे आयोजन करण्यात आले होते, परिसरातील नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन चांगला प्रतिसाद देत
एक टेम्पो ई कचरा संकलीत करण्यात आला. या वेळी केंद्र प्रमुख म्हणून दत्ता वाकडे व शिवाजी राऊत यांनी काम पाहिले तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र शेलगावकर, परमेश्वर गणाचार्य, माणिक कुंभार, बी जी पाटील, रघुनाथ पेहलवान, विश्वनाथ धोंडगे, शंकर टिकम, ऋषीकेश पाटील, अनिल सुपे,दशरथ म्हात्रे आदींनी परिश्रम घेत परिसरातील नागरिकांच्या घरातून ई – कचरा संकलीत केला.