भोकरदन प्रतिनिधि…
भोकरदन उस्मानपेट येथील मुस्लीम समाजाच्या स्मशानभूमीवरील अतिक्रमणाचा मुद्दा अनेक वेळा नगर परिषद ला वेळा वेळी तक्रार देऊन सुद्धा या कळे दुर्लक्ष केला जात आहे या प्रकरणी मुस्लिम समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुस्लीम समाजाने नगर परिषद ला पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु अध्यापही कार्यवाही झाली नाही याशिवाय मुस्लीम समाजानेही कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता शहरातील स्मशानभूमीच्या जागेवरच अनेक भूमाफियांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले
असून, मुस्लीम समाजाची अडवणूक करून भूमाफियांनी दादागिरी करत स्मशानभूमीच्या जमिनीवर अतिक्रमण करून भूखंड कापले आहेत. भूमाफिया आपल्या आवाक्याचा फायदा घेऊन गरीब अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील लोकांचे शोषण करत आहेत. अशा स्थितीत भूमाफियांसमोर बोलण्याचे धाडस कोणाचेच नाही. या अतिक्रमणाविरोधात मुस्लीम समाजातील नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, या भूमाफियांवर कारवाई करून कब्रस्तानची अतिक्रमणमुक्त न केल्यास मुस्लिम समाजाकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल, याला प्रशासनच जबाबदार असेल. याची नोद घ्यावी ही विनती