देशातील 5 राज्यांमध्ये ईडीची छापेमारी
उत्तराखंडमधील बनावट रजिस्ट्री घोटाळा प्रकरण
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट (हि.स.) : उत्तराखंडमधील ‘बनावट रजिस्ट्री घोटाळा’प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशातील 5 राज्यांमध्ये ईडीची कारवाई सुरू आहे. ईडी सर्वत्र शोध मोहीम राबवत आहे, राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम आणि पंजाबमधील लुधियानासह एकूण दीड डझन ठिकाणी शोध मोहीम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देशातील अनेक भूमाफिया, रजिस्ट्री कार्यालयात काम करणारे सरकारी कर्मचारी-अधिकारी, सरकारी वकील आणि काही बिल्डर यांच्या ठिकाणांवर ही कारवाई सुरू आहे. उत्तराखंडच्या डेहराडून येथे जुलै 2022 मध्ये बनावट रजिस्ट्री घोटाळा उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी 18 गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर 20 हून अधिक आरोपी तुरुंगात आहेत. या प्रकरणात दोन मोठे वकिलही आरोपी आहेत.