देगलूर /प्रतिनिधी
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक, देगलूर- बिलोली विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी देगलूर तहसील कार्यालयाने माध्यम कक्षाची निर्मिती केली यामुळे देगलूर – बिलोली सार्वत्रिक निवडणुकीच्या विविध कार्यक्रमाची माहितीला प्रसिद्धी मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर बिलोली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निर्णय निवडणूक अधिकारी तथा बिलोली उपविभागीय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे यांनी येथील तहसील कार्यालयात माध्यम कक्षाची निर्मिती केली. यामध्ये बिलोली तहसीलदार गजानन शिंदे यांना माध्यम नोडल अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली बिलोली नायब तहसीलदार पुरवठा सुषमा मोहोड यांना सहाय्यक मीडिया कक्षाची जबाबदारी सोपविली यांच्या अंतर्गत सहाय्यक नरहरी कोलगाणे, प्रा.महेश कुलकर्णी विठ्ठल चंदनकर, विजय शिकारे यांनी काम पाहिले. विधानसभा तसेच लोकसभा पोट निवडणुकीसाठी स्थापन झालेल्या माध्यम कक्षाने कामाचे उत्तम नियोजन करत जिल्हास्तरावर संपर्क ठेवून माध्यमांना प्रसिद्धीस येणाऱ्या मजकुरावर नजर ठेवली वर्तमानपत्रात देखील प्रसिद्ध होणाऱ्या मजकुरावर ,वृत्तावर बारकाईने लक्ष ठेवले सुषमा मोहोळ यांच्या टीमने काम करून प्रशासकीय कामासाठी सहकार्य केले आहे .
माध्यम कक्षाने दिवसभरात घडलेल्या प्रशासनातील घटना घडामोडींना प्रसिद्धीसाठी वर्तमानपत्रांच्या वृत्त संकलन करणाऱ्या वार्ताहरांना बातम्या प्रसिद्धीला दिल्या.निवडणूक कार्यालयावर एक वेगळी छाप करूनदिलीआहे.
नायबतहसीलदार
सुषमा मोहोड,नरहरी कोलगाने ,प्रा. महेश कुलकर्णी, विठ्ठल चंदनकर, विजय शिकारे यांनी लक्षवेधी काम केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...