जिल्हा न्यायालयीन कर्मचारी स्पोर्ट्स अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय सोलापूर डिस्ट्रिक्ट कोर्ट प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन कै.लिंगराज वल्लाळ क्रीडांगण आणि कुमठा नाका क्रीडा संकुल याठिकाणी करण्यात आले असून त्याचे उद्घाटन रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहात सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.शब्बीर अहमद औटी यांच्या हस्ते मैदानासह स्टम्पचे पूजन करून मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर तदर्थ जिल्हा न्यायाधीश, सोलापूर मिलिंद भोसले, दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश शंतनू जाहगीरदार, सोलापूरचे मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भांडारी, जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रबंधक पल्लवी पैठणकर सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष एड.सुरेश गायकवाड, युनिक हेल्थकेअरचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाटील , डिस्ट्रिक्ट कोर्ट प्रिमिअर लिग चेअरमन प्रसाद चुंगे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी स्पोर्ट्स अँड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष नबिलाल शेख, तृतीय श्रेणी कर्मचारी संघचे अध्यक्ष शाम राजेपांढरे, महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लिंबोळे आदींची उपस्थिती होती. उद्घाटन संपन्न झाल्यानंतर प्रमुख मान्यवरांचा पुष्प आणि नॅपकिन गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध चषकांचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.शब्बीर अहेमद औटी यांनी आपले मनोगत करताना न्यायाधीश आणि कर्मचारी यांच्यातील पडदा आज काढून टाका जीत हार मान्य करून सर्वच जण एक दिलाने खेळा असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.शब्बीर अहमद औटी यांनी डिस्ट्रिक्ट कोर्ट प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी केले. दरम्यान मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भांडारी यांनी आपले मत मांडताना सोलापूरकरांच्या उदंड उत्साहाचे कौतुक केले. तसेच सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर किंग जजेस आणि मंगळवेढा सुपर किंग या संघामध्ये सामना झाला.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या सामन्याचे नाणेफेक करण्यात आले. तत्पूर्वी प्रमुख मान्यवर सोलापूर जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश शब्बीर औटी यांचे ओक्षण करत ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सामन्याचे प्रथम पारितोषिक आठ हजार रुपये आणि चषक द्वितीय पारितोषिक पाच हजार आणि चषक तर तृतीय पारितोषिक हे तीन हजार रुपये चषक असे असणार आहे. त्याचप्रमाणे सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांना देखील वैयक्तिक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. तसेच न्यायाधीश डॉ.शब्बीर औटी आणि बार सोसिएशनने प्रीमियर लीगसाठी प्रत्येकी 5 हजार, तर युनिक हेल्थकेअर सेंटर कडून 21 हजार रुपयांचे देणगी देण्यात आले.याप्रसंगी असोसिएशनचे इतर पदाधिकारी सदस्य विधीज्ञ कर्मचारी क्रीडाप्रेमी उपस्थित होते.