सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील 83 ग्रामपंचायतींच्या सरपंच (Sarpanch election ) पदाच्या आरक्षणासाठी सोडत मंगळवार, दि. 15 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. आगामी पंचवार्षिक कार्यकाळ 2025–2030 या कालावधीसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी हा कार्यक्रम बहुउद्देशीय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे दुपारी 12 वाजता होणार आहे. (Sarpanch election )
तहसीलदार किरण जमदाडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, या सोडत कार्यक्रमात तालुक्यातील सर्व इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या सोडतीद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिला आरक्षणाचे प्रमाण ठरवून 2025–2030 या कालावधीसाठी सरपंच पदे (Sarpanch election ) आरक्षित करण्यात येणार आहेत. त्यामुळे गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेतृत्वाचे स्वरूप पुढील पंचवार्षिक काळासाठी निश्चित होणार आहे.