तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड: महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संलग्न शाखा नांदेड, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या वतीने मुदखेड ग्रामिण रुग्णालय येथील परिचारिकांनी राज्यव्यापी संप केला.
राज्यातील सरकारी आणि निमसरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये कार्यरत परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारने वारंवार दुर्लक्ष केल्याने अखेर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने १५ आणि १६ जुलै २०२५ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मागण्या मान्य न झाल्यास १८ जुलै ते २५ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
परिचारिका संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने यापूर्वी घेतलेल्या बैठकीत अनेक मागण्यांवर सकारात्मक भूमिका दर्शवली होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांपासून ते शिक्षक, पर्यवेक्षक आणि पठनप्रशिक्षिका पदावरील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “राज्यभरातील परिचारिकांना न्याय मिळावा यासाठी संघटनेनी शांततेच्या मार्गाने शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आंदोलनाशिवाय आता पर्याय उरलेला नाही.
मागण्या मान्य न झाल्यास १८ जुलै ते २५ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.