तभा फ्लॅश न्यूज/वाशी : जिल्हा प्रशासन व उत्स्फूर्त लोकसहभागातून वाशी येथे नगर पंचायतच्या वतीने सर्वे नंबर ६५ नवीन पाण्याच्या टाकीजवळ राबवण्यात आलेल्या “हरित धाराशिव अभियान” या मध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील प्राचार्य,प्राध्यापक वृंद, कर्मचारी, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्रसेना आणि ग्रीनक्लब व इतर असे एकूण १८० विद्यार्थी विद्यार्थींनी व ४० प्राध्यापक व कर्मचारी यांनी वृक्षारोपण करण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताने झाली यावेळी वाशी नगरपंचतच्या नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड, नगरपंचायत चे गटनेते श्री.नागनाथ नाईकवाडी, मुख्याधिकारी सुरेखा कांबळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम,नगरसेविका वंदना कवडे, शहरातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते. यावेळी ६ हजार वृक्ष लावण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व वृक्षरोपण व संवर्धनासाठी दत्तात्रय साठे यांनी शपथ दिली तर नगरपंचायत कार्यलयाचे अधीक्षक सयाजी माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.