तभा फ्लॅश न्यूज/बदनापूर : बदनापूर शहरातील गल्ली-बोळांपासून मुख्य रस्त्यांपर्यंत साचलेली घाण आणि तुंबलेले गटार हे ‘स्वच्छ भारत’च्या स्वप्नाला हरताळ फासणारे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. वाढत्या डासांच्या संख्येमुळे डेंग्यू व व्हायरल तापाचे रुग्ण वाढू लागले असून, नागरीक दुर्गंधी व रोगराईच्या कचाट्यात सापडले आहेत.बदनापुर शहरात ठिकठिकाणी घाण मोदीजी च्या स्वच्छ भारत मिशन ची खाली घातली मान.गरपंचायत प्रशासनाचे ‘सोयीस्कर दुर्लक्ष’ आणि ढिसाळ नियोजन यामुळे शहरातील स्वच्छता पूर्णपणे कोलमडली आहे. शहरातल्या प्रत्येक वॉर्डात कचऱ्याचे ढिगारे आणि साचलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेला दुर्गंधीयुक्त वातावरण नागरिकांच्या आरोग्याला धोका ठरू लागला आहे.
स्थानिक नागरीक संतप्त आहेत. “दरवर्षी लाखोंचा खर्च करूनसुद्धा शहरात स्वच्छतेचे नावानिशाण नाही. हा निधी खरोखर स्वच्छ- तेसाठी खर्च होतो की दुसऱ्याच कुणाच्या खिशात जातो, हे कोण तपासणार?” असा संतप्त सवाल नागरीक करत आहेत.
नागरिकांच्या मागण्या शहरात तातडीने स्वच्छता मोहिम राबवावी डास निर्मूलनासाठी फवारणीची व्यवस्था करावी.
सांडपाण्याच्या योग्य निचऱ्याची यंत्रणा उभी करावी.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. नगरपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे शहराची विद्रूप स्थिती झाली असून, नागरिकांनी आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे. प्रशासनाने वेळेत उपाय योजना केली नाही, तर शहरातील संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
बदनापुर शहरात ठिकठिकाणी घाण मोदीजी च्या स्वच्छ भारत मिशन ची खाली घातली मान,कदाचित नगरपंचायत चे डॉक्टर लोकानकडन हफ्ते पक्के झाले असावे,मार्केट कमीटी मध्ये सकाळी फिरायला जा आणि मच्छारा ना सोबत घेऊन या,घरी आलेल्या पावन्या ना आमचे बदनापुर पहा आणि जातानी डेंगू मलेरिया चा वानुळा सोबत घेऊन जा.