तभा फ्लॅश न्यूज/ ॲड. रणजित जामखेडकर : छावा सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री विजय घाडगे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी काही गुंडासह लातुर येथे अमानुष हल्ला केला. या हल्ल्याबाबत छावा संघटनेच्यावतीने तिव्र निदर्शने करत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राजकारणाचा तिव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
या हल्ल्यामध्ये छावा संघटनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले गेले असून, हि घटना लोकशाहीविरोधी व कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे.
राज्याचे कृषि मंत्री कोकाटे यांनी सरकारमध्ये राहुन शेतकऱ्यांना न्याय देण्याची भुमिका असताना राज्याच्या पवित्र सभागृहात मोबाईलवर जंगली रम्मीचे पत्ते खेळत बसले ही बाब लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. कृषी मंत्री हे शेतकऱ्यांची अनेकवेळा जाणुन बुजुन खिल्ली उडविण्याची एकही संधी सोडत नाहित.
छावा संघटनेच्यावतीने लोकशाहीच्या मार्गाने विजय घाडगे यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना लेखी निवेदन दिल्याचा राग धरून गुंडगिरी पध्दतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यांच्या कार्येकर्त्यानी बेदम मारहाण केली आहे.
गुंड प्रवृत्तीच्या सुरज चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या गुन्हेगाराविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा व सदरिल हल्ल्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करुन गंभीर गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात यावा, सुरज चव्हाणसह त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, कृषि मंत्री माणिक कोकाटे यांची मंत्रीमंडळातुन हाकलपट्टी करण्यात यावी अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर तिव्र आंदोलनाचा इशाऱ्यांचे निवेदन मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेनेचे भालचंद्र नाईक,संभाजी ब्रिगेडचे प्रदीप पा. हसनाळकर,शिवसेना तालुका प्रमुख
उमेश पा आलूरकर, छावाचे तालुकाध्यक्ष गिरीधर पा.केरूरकर,राजमुद्रा चे सचिन पा. इंगोले,शिवसेना शिंदे गटाचे बालाजी पा. ढोसणे, युवक काँग्रेसचे तुकाराम पा.सुडके, शिवसेना शहर प्रमुख शंकर चिंतमवाड,सदाशिव पा. गोजेगावकर,सूर्याजी पा.शिंदे, काँग्रेसचे युवा नेतृत्व अविनाश पा.इंगळे,बजरंग पा. जिगळे,आनंद पाटील,माधव पाटील,बालाजी पा.बोडके,गोविंद पा.टेकाळे, बालाजी पा.शिंदे,धम्मानंद जोंधळे मोटरगेकर, कपिल काठेवाड,दामोदर गाढवे, श्रीकांत शिंदे,आनंद खंडागळे,संतोष पा.इंगोले यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.