तभा फ्लॅश न्यूज/ नवीन नांदेड : अवैद्यरित्या मोबाईल टॉवर उभारणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी धनेगाव मुजाम पेठ येथील जय हनुमान सोसायटीच्या नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव, नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे, जिल्हाधकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे एका निवेदना मार्फत करण्यात आले आहे. सदरील मोबाईल टॉवर उभारल्यास आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
धनेगाव ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत जय हनुमान सोसायटी मध्ये भर वस्तीत मोबाईल टावर उभारण्यात येत आहे. सदरील टावर मधून बाहेर पडणारे रेडिएशन पल्सेस हे लहान मुलांच्या आरोग्यास धोकादायक असल्यामुळे हा मोबाईल टावर भरवस्तीत उभारू नये अशी तक्रार जय हनुमान सोसायटी येथील नागरिकाने गावचे सरपंच गंगाधर पिंटू पाटील शिंदे यांच्याकडे केली होती. तर सदरील प्रकरण सरकार दरबारी न्याय मिळावा म्हणून माझी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे हे ही प्रयत्न करत आहेत. टावर उभारण्यात येऊ नये ही तक्रार टावर उभारणी करणाऱ्यांनी नोटीस न मानता केराची टोपली दावत टॉवरची उभारणी करण्यात येत आहे.
दरम्यान, गावकऱ्यांनी आक्रमक रूप धारण करून केल्याने टॉवरचे काम तूर्तास बंद ठेवण्यात आले आहे. तरी मोबाईल टाॅवर उभारणी करण्यासाठी टाॅवर कंपनीचे अधिकारी – कर्मचारी उभारणीस प्रयत्न करत आहेत. तेव्हा हा मोबाईल टाॅवर कोणत्याही परिस्थितीत येथे उभारण्यास परवानगी प्रशासनाने देऊ नये; अशी मागणी जयरा जयहनुमान सोसायटी धनेगाव येथील नागरिकांनी केली आहे. जर टॉवरची उभारणी केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.