तभा फ्लॅश न्यूज/लोहा : गोदावरी काठाच्या गावातून हजारो ब्रास अवैध वाळू उपसा केला जातो. ग्रामीण रुग्णालय व आय.टी.आय परिसरातुन दरोरोज मुरमाची वाहातुक होते.शासनाचा महसूल बुडवून मुरुम,वाळू चोरटे विना नंबरच्या हायवा टिपर वाहानातुन सकाळी आणि राञीला मोठ्या प्रमाणात विना नंबर वाहानातून मुरमाची,रेतीची वाहातुक केली जाते ,समोरील खबऱ्याचे लोकेशन घेण्यासाठी अवैध रेती हायवा चालकाचा एक हात मोबाईल कानाला लावून तर दुसरा हात स्टेअंरिगवर ठेवून तुफान वेगात विना नंबर हायवा टिपरची वहातुक केली जाते.
पोलिस व महसूल प्रशासनाच्या समोरुन तुफान वेगात रेती व मुरुंमाची वाहातुक होते याकडे यञंना बघ्याची का भूमिका घेते मग हि यञंना कशात बरबटली म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.रस्त्या लगत पोलिस स्टेशन असताना अति वेगात जाणाऱ्या वाहनांकडे पोलिस स्टेशन व अवैध रेती महसुल पथक, महसूल मंडळाधिकारी, तलाठी जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसुन येतात ,रस्त्यावर लावलेली सि.सि.टिव्ही यञंना , महसूल पथक, महसूल कर्मचारी कोणाच्या आदेशाने कोणते कृर्तत्वे बजावतात म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
शहरातील ग्रामीण रुग्णालय व आय.टी.आय.परिसरातुन दररोज मुरुमाची वाहातुक होते याची कल्पना पोलिस व महसूल यञंनेला माहिती असताना याकडे कानाडोळा केला जातो. गोदाकाठावरील बेटसांगवी, शेवडी, पेनुर, भारसवाडा, अंतेश्वर, चित्रा वाडीसह सीमा भागावरील गावातून रात्री चोरट्या मार्गाने हजारो ब्रास रेती उपसा केला जातो. याकडे पोलिस स्टेशन,मंडळ, महसूल अधिकाऱ्याची यंञना छुपा पाठिंबा देत असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे.
शहरातून रात्री रेती हायवा टिपरची वाहतूक होत असताना पोलिस प्रशासन बघ्याची भुमिका का घेते हा मोठा प्रशन आहे. वाळूने भरलेले हायवा टिप्पर दररोज रात्री व सकाळी रात्रभर पोलिस स्टेशनच्या समोरून लातूर जिल्ह्याकडे वाहतूक होत असते याकडे दुर्लक्ष का केले जाते. यावर पोलिस प्रशासन कोणतीही कारवाई करण्यास का धजावत नाही. या प्रकारामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अवैध वाळू, अवैध मुरंम वाहतुकीकडे पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी लक्ष देऊन शहरातील वाळू वाहतूक बंद करावी अशी मागणी जनतेने केली आहे.