तभा फ्लॅश न्यूज/ नागपूर : महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची गैरहजेरी व कामचुकारपणा थोपवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ‘फेस ॲप-जिओ फेन्सिंग सिस्टीम’ महसूल कर्मचाऱ्यांसाठी लवकरच अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
या नवीन प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयातच GPS (जिओ फेन्सिंग) व कॅमेऱ्याच्या मदतीने नोंदवली जाईल. यासाठी लवकरच शासन निर्णय (GR) जाहीर करण्यात येणार आहे.
ऑगस्ट महिन्याचे वेतन (जे सप्टेंबरमध्ये देय असेल), केवळ फेस ॲपद्वारे उपस्थिती नोंदवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच दिले जाईल, असे स्पष्ट करत महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता आणि लोकाभिमुखता आणणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.