तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : सोलापूरात दहा महिन्यांपासून सतत पाठलाग करून तरुणीचा विनयभंग करणाऱ्या विरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून अल्ताफ शेख या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी अल्ताफ हा पीडितेचा गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून पाठलाग करत आहे. तसेच पीडितेने त्याच्याबरोबर लग्न करावे म्हणून सतत फोन करतो. यातूनच आरोपी पीडीतेचा मागील दहा महिन्यांपासून सतत पाठलाग करून तिच्या मनातला जे वाटेल असे कृत्य करत होता. याप्रकरणी 27 जुलै रोजी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत.
Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...