तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : पंढरपूर हे भाविकांच्या श्रद्धेचा महासागर आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात यंदा स्वच्छतेचा नवीन आदर्श निर्माण केला. “स्वच्छ वारी, निर्मळ वारी” या संकल्पनेखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नगरपालिका प्रशासन, जिल्हा यंत्रणा आणि पंढरपूर नगरपरिषद यांनी नियोजन व अंमलबजावणी करत जवळपास 20 लाख भाविकांची सेवा केली. नगरपालिका प्रशासनाने पालखी मार्ग व पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यात उत्तम काम केले आहे.
नितांत स्वच्छतेचे नियोजन
शहराचे 11 स्वतंत्र भागांमध्ये वर्गीकरण
प्रत्येक विभागासाठी नोडल ऑफिसर हायजिन व 60 सदस्यीय कार्यपथकाची नियुक्ती
चंद्रभागा वाळवंट, भक्ती सागर परिसर आदी ठिकाणी विशेष स्वच्छता उपक्रम
2000 तात्पुरते व 4250 कायमस्वरूपी शौचालयांची व्यवस्था
शौचालय साफसफाई, सक्शन यंत्र, निर्जंतुकीकरण, पाणी पुरवठा व हँडवॉश सेवा कार्यक्षमतेने
उदात्त संकल्पना
ओपन डिफेकेशन फ्री चंद्रभागा वाळवंट – तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या टीमचे शिस्तबद्ध जनजागृती अभियान.
कचरा खाली पडण्याआधी संकलन – शहरात 50 कचरा संकलन केंद्र, माशाच्या आकाराच्या विशेष फॅब्रिकेशन पेट्या
सर्वंकष समन्वय व सहभाग
ऑनफील्ड पाहणी, वस्तुनिष्ठ सूचना व वारंवार समन्वय बैठका
वॉकी-टॉकी व WhatsApp गटांद्वारे क्षणाक्षणाचा संपर्क
प्रशासनातर्फे बाळासाहेब चव्हाण, दयानंद गोरे, रमाकांत डाके, वैभव पाटील यांसह 15 मुख्याधिकारींचे योगदान
स्वतः जिल्हाधिकारी साहेबांचे प्रत्यक्ष नियंत्रण व मार्गदर्शन
वीणा पवार (ब्रँच डायरेक्टर हायजिन) व महेश रोकडे (मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद) यांचे विशेष समन्वय.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छतेच्या कामाचे कौतुक व्यक्त केले. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा प्रशासन नगरपालिका विभागाने राबवलेल्या स्वच्छते मोहिमेचे कौतुक केले.
वारकरी भाविक, दिंडीप्रमुख आणि लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या सुविधा आणि स्वच्छतेबद्दल समाधान व्यक्त केले. ही यात्रा केवळ श्रद्धेचे दर्शन नव्हे, तर सार्वजनिक प्रशासनाच्या सक्षमता आणि लोकसेवेचा नवा आयाम ठरली. सोलापूर जिल्हा प्रशासनाने सामूहिक सहभाग, तंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक भावना एकत्रित करत ‘स्वच्छ वारी, निर्मळ वारी’ ही संकल्पना सत्यात उतरवली.