तभा फ्लॅश न्यूज/धाराशिव : धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील शेतात काम करण्यासाठी बोलावून एका ४० वर्षीय महिलेसोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने बेंबळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार दिली. पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका तरुणाने पीडित महिलेला शेतात काम आहे असे सांगून तिला लिंबाच्या झाडाखाली नेले व तेथे तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित महिलेने बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.