तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या प्रमोद सुरेश कापसे यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील कृषी पदवीधरांच्या संघटनेचीही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.
या निवडीबद्दल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे आभार मानले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या विकास दृष्टिकोनात स्वतःचा ठसा उमटवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रमोद कापसे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई, शाहू,
पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी पदवीधर, शेतकरी, उद्योजक, अधिकारी, शासकीय व कंत्राटी कर्मचारी हे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात अग्रस्थानी राहतील याची खात्री त्यांनी दिली आहे.
Post Views: 7