तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड : समस्त शेतकरी बांधव व खरेदी विक्री करणारे व्यापारी व कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्याय विरोधात शहरातील जमीयतुल कुरेशी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी कुरेशी मोहल्ला येथुन मुक मोर्चा काढून तहसील कार्यालय मुदखेड येथील नायब तहसीलदार संतोष कामठेकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात कूरेशी समाज हा आपला पारंपारिक व्यवसाय बैल, म्हैस,शेळी, इत्यादी जनावराची आठवडी बाजारात ने आणण्यासाठी वाहतुकीने खरेदी – विक्री करत असतात वाहतूक करीत असताना काही संघटने कडून रस्त्यावर गाडी अडवून जातीवाचक व अश्लील भाषेत शिवीगाळ व मारहाण करून मोब लिंगचीग करत असतात
कायद्याच्या चौकटीत बसून पण बाजार समितीचे परवाने जनावराचे दाखले वैद्यकीय प्रमाणपत्रे तसेच वाहतुकीय परवाने आधी सर्व कायदेशीर कागदपत्रे आमच्याकडे असतात संघटना तरी देखील काही स्वयंघोषित संघटना व स्थानिक घटक आमच्या समाजावर अन्याय करत आहे.
समाजावर होणारे दिवसेंदिवस गो गोरक्षना कडुन होत असलेला त्रास यांना प्रतिबंध करण्यासाठी कुरेशी समाजाकडून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी मुदखेड कुरेशी समाज तालुका अध्यक्ष मोहम्मद गौस अब्दुल रहमान, शहराध्यक्ष मोहम्मद खासिम मोहम्मद हुसेन यांच्या सह कुरेशी समाज बांधव यांची उपस्थिती होती. या मूक मोर्चा चे आयोजन शहरातील समस्त खुरेशी समाज बांधवांनी केले होते.