तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
नागपूर येथे राज्यातील जिल्हाधिकारी यांचे काॅन्फरन्स घेण्यात आले. या बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शेतकरी यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले आहे. शासकीय जमिनी सुरक्षित राहण्यासाठी ‘लॅन्ड बॅंक’ नावाने नाविन्यपूर्ण योजना तयार केली आहे. सेवादूत उपक्रमाद्वारे त्यांनी शासकीय दाखले घरपोहोच देणेची व्यवस्था केली आहे. एका क्लिकवर घरपोहोच दाखले देणेची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी आदर्श आचारसंहिता तयार करून दशसुत्री करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर संस्कार देखील चांगले प्रकारे होत आहेत.
Post Views: 9