मुदखेड तालुक्यातील मौजे रोहीपिंपळगाव येथील अल्प भुधारक शेतकरी प्रकाश शिंदे यांच्या मुलीने गावातील एका टवाळखोर मुला कडून सतत होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून राहत्या घरातील स्वयंपाक घरात गळफास घेऊन आत्म हत्या केली असल्याची घटना दि. २१ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली होती.या घटने प्रकरणी मुदखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही आरोपी उद्धव भाऊराव शिंदे यास अटक करण्यात आली नाही.
या विषयी पिडीत मुलीचे वडीलां प्रकाश शिंदे यांच्याशी विचारना केली असता ते म्हणाले की माझ्या मुलिची या मुला कडून मागील सहा महीण्या पासुन छेडछाड काडली जात होती आम्ही मुलाच्या आई वडीलांशी या विषयी समजून सांगितले होते.तरी सुद्धा परत त्याने आम्ही शेतात गेल्या वर मुलीची छेड काढली या सततच्या छेडछाडीला कंटाळून मुलिने आत्महत्या केली. अशी माहिती पिडीत मुलीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली.व तसेच आरोपीस तात्काळ अटक करून माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.