तभा फ्लॅश न्यूज : पोलीस म्हटले की, खाकी… अपवाद वगळता आपल्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र सतत कर्तव्यावर हजर राहणाऱ्या पोलीस दलाचे आपण सर्व नागरिक ऋणी आहोत. सण-उत्सव, आंदोलन, आपत्ती असो वा कोणतीही तातडीची परिस्थिती, पोलीस अधिकारी व कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावतात अशा बांधवांना नवीन पायंडा म्हणून भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्यावतीने रक्षाबंधनाचा सण कळंब शहरात वेगळ्या पद्धतीने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने साजरा करण्यात आला. जिल्हा सचिव सौ. वनिताराणी कटाळे आणि तालुका उपाध्यक्ष सौ. जान्हवी पत्की यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस बांधवांना राखी बांधून, गोडधोड देऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
तसेच वाशी येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीकडून ही अनोखा उपक्रम वाशी पोलीस स्टेशन मध्ये केली राखी पौर्णिमा साजरी त्यावेळी महिला तालुकाध्यक्ष त्रिशाला देशमुख, वाशी नगराध्यक्ष विजयताई गायकवाड, बीजेपी तालुका उपाध्यक्ष पुष्पाताई पोरे, बेटी पढाव बेटी बचाव च्या उज्वला ताई पाटील, रेश्मा ताई डोरले तसेच अनेक महिला कार्यकर्त्या यांनी एकत्र येऊन आज सकाळी वाशी येथील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांना राखी पौर्णिमेनिमित्त राखी बांधण्याचा कार्यक्रम करण्यात आला.
पोलिस बांधवांनीही या उपक्रमाचा मनापासून आनंद व्यक्त केला.रक्षाबंधनाच्या या अनोख्या उपक्रमामुळे पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील स्नेह, विश्वास आणि आदराची भावना अधिक दृढ झाल्याचे मत व्यक्त केले.