तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर : दहीहंडी मिरवणूकीत दयावान ग्रुपने बाळीवेस येथील विजयी चौकात सादर केलेल्या जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज वैंकुंठगमन या हलत्या देखाव्यामुळे वातावरण भक्तिमय झाले. भगवान श्रीकृष्णांची आकर्षक प्रतिमा, प्रत्यक्ष वरुणराजाने केलेले गोविंदा पथकाचे स्वागत अशा वातावरणात वडार समाज गोविंदा पथकाने दयावान ग्रुपची ३० फूट उंचीवरील दहीहंडी फोडली.
दहीहंडीचे यंदाचे १६ वे वर्षे होते. प्रारंभी माजी राज्यमंत्री आमदार विजय देशमुख, माजी नगरसेवक अनंत जाधव, संयोजक आणि माजी नगरसेवक विनायक विटकर, अध्यक्ष अशोक अलकुंटे, महेश तापडिया, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, प्रमोद मोरे, डिके सामाजिक संस्थेचे दशरथ कसबे, अमोल झाडगे, योगेश कुंदूर आदींच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडीचे पूजन करण्यात आले.
Post Views: 8