तभा फ्लॅश न्यूज/माहूर : किनवट या तालुक्यांसह नांदेड जिल्ह्यात दिनांक १४ ऑगस्ट रोजी च्या मध्यरात्रीपासून पावसाचा जोर जिल्ह्यातील सर्व सोळाही तालुक्यांमध्ये सारखा कायम असल्याकारणाने अतिवृष्टी व नदी-नाल्याला आलेल्या पूरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसानग्रस्त सर्व बाधीतांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मंजूर करून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यास संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये तातडीने रक्कम जमा करावी,
अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासनाने भरीव आर्थिक मदत देऊन प्रचंड आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार घेऊन माहूर,किनवटसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अतिवृष्टी व पूरामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून बाधीत शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड यांच्यावतीने मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड, मनवीसे राज्य उपाध्यक्ष दीपक स्वामी,मनविसे जिल्हाध्यक्ष,
पवन पाटील,मनवीसे शहराध्यक्ष शुभम पाटील, मनवीसे जिल्हाध्यक्ष शक्ती परमार,मनविसे जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड,जिल्हा उपाध्यक्ष योगेश मोरे,उत्तर विधानसभा अध्यक्ष विशाल पावडे,भोकर माजी शहर अध्यक्ष आकाश घंटेवाड, मनविसे शहर सचिव अमर कोंडराज,मनसैनिक धम्मपाल आढाव,विठ्ठल राठोड,संजय खराडे यांच्यावतीने जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..