तभा फ्लॅश न्यूज/हदगाव : हदगाव तालुक्यातील करमोडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भर पावसात बाधित क्षेत्राची पाहणी करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार हे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत लवकरच पंचनामे होऊन शासनातर्फे जे मदत शक्य आहे मदत केली जाईल असे आश्वासन यावेळेस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
यावेळी आ. बाबुराव कदम कोहळीकर , जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हाप्रमुख विवेक देशमुख , माजी खासदार सुभाषराव वानखेडे, भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, अनिल पाटील बाभळीकर, निळू पाटील कल्याणकर यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.