तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर : शहरात डाॅल्बी मुक्त उत्सव,जयंती साजऱ्या झाल्या पाहीजे यासाठी चळवळ उभी राहिली आहे. तरी येणाऱ्या गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये डीजे,लेझर शो वर बंदी घातली पाहीजे, ध्वनी प्रदुषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी ज्येष्ठांनी केली,त्यावर एकमत होवून सर्व मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेमुक्त उत्सव साजरा करण्याची हमी दिली. मात्र पोलिस आयुक्त एम. राजकुमार व जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी डीजे पुरता बंद करण्यासाठी िवचार विनिमय करून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान गणेशोत्सव साजरा होणार आहे.तरी पोलिस आयुक्तालयात गुरुवारी गणेशोत्सव च्या अनुषंगाने शांतता कमिटी सदस्य ,गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्याची बैठक पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीत डीजे बंदी झाली पाहीजे यासाठी ज्येष्ठ नागरिक संघटनांचे सदस्यही सहभागी झाले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचीही प्रमुख उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्ताविक उपायुक्त अश्विनी पाटील यांनी केले. बैठकीत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते अडीअडचणी प्रशासनासमोर मांडल्या. या बैठकीत अॅड. धनंजय माने, सुनिल रसाळे, हेमा चिंचोळकर, अॅड. यु.एन. बेरीया, माजी महापौर आरिफ शेख आदी उपस्थित होते.
बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त एम राजकुमार, सोलापूर महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे ,वाहतूक शाखा विभागाचे पोलिस उपायुक्त हसन गौहर, धर्मादाय आयुक्त, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजन माने,सोलापूर महानगर पालिकेचे अधिकारी सारिका आकुलवार सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त पोमण,सर्व सातही पोलिस ठाण्याचे अधिकारी – कर्मचारी , महावितरण विभागाचे कर्मचारी माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे , दास शेळके श्रीकांत घाडगे, सुनील रसाळे, अमोल बापू शिंदे, दत्ता भोसले,लताताई फुटाणे, हेमा चिंचोळकर, अनिता पवार , वैभव गंगणे, सुभाष कलशेट्टी , शिवानंद येरटे,प्रवीण जाधव ,आरिफ शेख ,हेमंत पिंगळे , श्यामराव गांगर्डे, बापू चराटे लहू गायकवाड अरुण देवकर , भैय्या जगताप, शहरातील मध्यवर्ती महामंडळ चे सल्लागार उत्सव अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 23