तभा फ्लॅश न्यूज/पारध : जुन्या भांडणाच्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे .
पहिली घटना: तरुणाला काठीने मारहाण
पहिली घटना शुक्रवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४ च्या सुमारास घडली. गावातीलच तरुणाला त्याच्या घरासमोरच आकाश रवि देशमुख, चेतन सुनील देशमुख, स्वप्निल रवि देशमुख आणि गणेश शाम क्षीरसागर या चार आरोपींनी अडवले. “माझ्यासोबत मागे का वाद घातला?” असे म्हणत त्यांनी वाद घातला.
काहीही वाद नसल्याचे सांगितले असता, आरोपींनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यातील आरोपी हातातील काठीने डोक्यावर मारून त्याला गंभीर दुखापत केली, ज्यात त्याच्या डोक्यातून रक्त आले. याप्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला .
दुसरी घटना: बस स्टँडवर तलवारीने धमकी
पहिली घटना घडल्यानंतर दुसरी घटना घडली. गावातील पारध बस स्टँडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अडवण्यात आले. यावेळी पाच ते सात अनोळखी व्यक्तींनी एकत्र येऊन त्यांना मारहाण केली.
सदर घटनेची माहिती पोलीस निरक्षक संतोष माने यांना माहिती मिळताच आपल्या फौज फट्यासह भेट देऊन दुन्ही गटनावर शातंता राखण्याचे आवाहन केले गावात पोलीसांनी हस्तक शेप केल्यामुळे शांताता आहे फढील तपास जमादार प्रकाश सिनकर हे करीत आहे