तभा फ्लॅश न्यूज/माहूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कामावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलने मोर्चे काढून निवेदने देण्यात आली. शासनाकडून समायोजन करण्याचे आश्वासनही देण्यात आले.
शासकीय सेवेत अद्यापही समायोजन झाले नसल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समीती, महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कामावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होऊन रुग्णांसह नागरिकांना आर्थिक,मानसिक फटका बसत असल्याने शासनाने त्यांची मागणी तात्काळ मान्य करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांसोबतच आता नागरिकांमधून देखील होत आहे.